
चिपळूण येथील तरुणाचा मृत्यू बसने ठोकरल्याने
मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण येथे हॉटेल अभिरुची जवळ मोटारसायकलवरील नाबाब अश्रफ तुरुक या तरुणाचा मृत्यू बसने ठोकरल्याने झाला आहे.
या प्रकरणी बस चालक पंढरीनाथ निकम याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे सदरचा तरुण हा आपली स्कुटी स्कूटर घेऊन जात असता हॉटेल अभिरूची जवळ रस्ता खराब झाल्याने त्याने स्कूटरचा वेग कमी केला त्यावेळी आलेल्या बस ने त्याला धडक दिली होती त्यानंतर बस चालक तेथून निघून गेला होता
www.konkantoday.com