
चिपळुणात महामार्ग चौपदरीकरणाच्यासंयुक्त मोजणीचे काम सुरू
चिपळूण शहरात मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी नागरिकांनी मागणी केल्याप्रमाणे संयुक्त मोजणीचे काम सुरू झाले आहे.चौपदरीकरणाचा प्रारूप आराखडा सादर न केल्याने तसेच उड्डाणपुलाच्या मागणीसाठी येथील नागरिकांनी मोजणीचे काम दोन तीन वेळा थांबविले होते. मोजणीच्या वेळी काही ठिकाणी वाढीव जागा संपादित होत होती यामुळे पावसानंतर नागरिकांनी संयुक्त मोजणीची मागणी केली होती .त्याप्रमाणे सर्व खात्यांच्या अधिकाऱयांच्या उपस्थितीत ही मोजणी सुरू झाली असून आता त्या ठिकाणी मार्किंग करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com