राजापूर कोंडये येथे विद्यार्थिनीवरअतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
राजापूर तालुक्यातील कोंडे येथे विद्यालयातून घरी परत जाणाऱ्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपावरून सुरेंद्र बाइत या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .
फिर्यादी ही मुलगी विद्यालयातून पांगरे ते कोंडे अशी पायवाटेने जात असता सुरेंद्र बाईत त्या तरुणाने तिला अडविले. व तीच्या वर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला .सदर मुलीने प्रतिकार केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत जखमी झाली . त्यातूनही आरडा ओरड करून या मुलीने आपली सुटका करून घेतली. या प्रकारात ती जखमी झाली .तिने राजापूर पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे .
www.konkantoday.com