नागरिकांच्या आरोग्याबाबत नगर परिषद प्रशासन गंभीर नाही ?
आपले शहर स्वच्छ असावे यासाठी नागरिकांना आवाहन करणारे रत्नागिरी नगर परिषद आरोग्य प्रश्नावर गंभीर आहे का ?असा सवाल नागरिकांना पडत आहे.रत्नागिरी शहर स्वच्छ रहावे यासाठी नागरिक नगर परिषदेच्या घंटागाडीत कचरा देऊन सहकार्य करीत आहेत. मात्र नगर परिषदेकडून नागरिकांच्या आरोग्याबाबत काळजी घेत जात नसल्याचे दिसत आहे.अनेक ठिकाणी गटारे तुंबून सांडपाणी वाहणे असे प्रकार असूनही नगर परिषद प्रशासन त्यावर कोणतीही कार्यवाही करीत नाही.त्यामुळे अशा सांडपाण्यामुळे होणाऱ्या डासांमुळे शहरात साथीचे म्हणजे डेंग्यू सारख्या साथी वाढल्या आहेत. नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
______________________________________
माई हुंडाई रत्नागिरीमधून सेंट्रो सीएनजी कार खरेदी करा आणि पेट्रोल दरवाढीची चिंता सोडा संपर्क-9922949540,9206202122
______________________________________
रत्नागिरी शहरातील मच्छीमार्केट रोडवरील भाजी मंडई जवळील टिळेकर बिल्डिंगजवळील गटारे सांडपाण्याने तुंबली आहेत.यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती होत आहे.याबाबत नागरिक तक्रारी अर्ज करून थकले आहेत. शहरात काही भागात डासांची फवारणी चालू आहे.परंतु त्यामुळे डास नष्ट होतात की नाही हा मोठा प्रश्न आहे.तसेच ज्या गतीने ही फवारणी होणे आवश्यक ती येथे होताना दिसत नाही. यामुळे नागरिकांच्या आरोग्यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नात तरी नगर परिषदेने गांभीर्याने लक्ष घालावे अशी जनतेची मागणी आहे .
www.konkantoday.com