
एसटीच्या ढिसाळ कारभार,एका चाकाचे नटबोल्ट गायब
एस्टीच्या गाड्या वारंवार नादुरुस्त असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी असतानाच संगमेश्वर येथील बसस्थानकातून सुटलेली संगमेश्वर तांबेडी ही बस एसटी बस स्थानकापासून दहा फुटावर चढाव चढत असताना गाडीचे चाक जाम झाले.
_______________________________________
माई हुंडाई रत्नागिरीमधून सेंट्रो सीएनजी कार खरेदी करा आणि पेट्रोल दरवाढीची चिंता सोडा संपर्क-9922949540,9206202122
______________________________________
समोरच्या वाहनाला बाजू देण्यासाठी चालकाने एसटी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु एसटी अचानक मागे येऊ लागली त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी तातडीने बसच्या टायरच्या मागे दगड ठेवून मागे येणारी एसटी थांबवली. याबाबत हा प्रकार कसा घडला हे पाहण्यासाठी तपासणी केली असता बसच्या पाठीमागील एका चाकाला एकही नटबोल्ट नसल्याचे दिसून आले. एसटीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे.या गाडीत तिस प्रवासी होते.
www.konkantoday.com