ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय शरद पवारांकडून रद्द
पोलिस आयुक्तांच्या विनंतीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय रद्द केला पवार आज दुपारी दोन वाजता ईडी कार्यालयात हजर होणार होते परंतू पोलीस आयुक्त यांनी पवार यांची भेट घेऊन त्यांनी ईडी कार्यालयात जाऊ नयेअशी विनंती केली . कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे सांगितले.कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून आपण हा आपला निर्णय मागे घेतला आहे. आपल्याला सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे पवार यांनी आभार व्यक्त केले .त्यात त्यांनी शिवसेनेचाही उल्लेख केला.आपण शिखर बँकेत संचालक नसताना देखील ईडीने आपणावर गुन्हा दाखल केला आहे तोही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर.आपण चौकशीला जायला तयार आहोत. लोकांपर्यंत चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून आपण आपणहून ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला होता . आता पुण्यात जावून पुरग्रस्तांची भेट घेणार असल्याचे त्यानी सांगितले. या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी तीव्र आंदोलने केली.
www.konksntoday.com