आता भाजपमध्ये शिवसेनेतुन इनकमिंग
विधानसभा निवडणुकीत भाजप सेना युती होणार की नाही याबाबत अद्याप निर्णय झाला नसला तरी भाजपने आपली जिल्ह्यात ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे.भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी आपला अध्यक्षपदाचा अधिभार स्विकारल्यानंतर जिल्ह्यात विविध ठिकाणी दौरे केले. तसेच तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क करण्यास सुरुवात केली.यामुळेच आता भाजपमध्ये देखील अन्य पक्षातून इनकमिंग सुरू झाले आहे.भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेतील जिल्हा परिषद दाभोळे गटातील दाभोळे गावातील शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला यांचे भारतीय जनता पक्षात स्वागत करण्यात आले.
श्री.काशीनाथ सकपाळ,श्री.प्रशांत देवळेकर,श्री.पंकज देवळेकर,श्री.प्रथमेश शिंदे,श्री.रूपेश सुवारे,श्री.किशोर सकपाळ,श्री.बाळकृष्ण गुरव,श्री.गजानन गुरव,श्री.लक्ष्मण गुरव,श्री.दत्ताराम पितळे या प्रमुख कार्यकर्त्यांनी आज प्रवेश केला.
www.konkantoday.com