
अजित पवार यांचा आमदारकीचा राजीनामा कारण स्पष्ट नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हा राजीनामा मंजूर केला आहे. अजित पवारांनी कोणतंही कारण न देता राजीनामा दिला आहे. अजित पवार यांचा राजीनामा मंजूर केल्याचे बागडे यांनी सांगितले. “माझ्या विधानसभा मतदारसंघाचा राजीनामा मी देत आहे असा फोन अजित पवार यांनी स्वतःहून मला केला म्हणून मी तो मंजूर केला असं बागडे यांनी सांगितले.” राजीनामा दिल्यानंतर अजित पवार कुठे आहेत हे कळलेलेनाही तसेच ते मीडियासमोरही आले नाहीत त्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा कोणत्या कारणामुळे दिला हे स्पष्ट झालेले नाही