
शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांच्या विरोधी पक्षप्रमुखांकडे तक्रार
जिल्हा परिषदेचे शिक्षण अर्थ समिती सभापती सहदेव बेटकर यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील खासदार सुनील तटकरे यांची सदिच्छा भेट घेतली होती .मात्र ही भेट त्यांना आता जड जाणार असे दिसत आहे. बेटकर यांच्याविरोधात शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे पुराव्यासह तक्रार करण्यात आली आहे.त्यांच्याकडून आदेश आल्यावर सभापतींवर लवकरच कारवाई केली जाईल अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी दिली आहे. बेटकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्याची भेट घेतल्याने ते शिवसेना सोडून राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा सुरू होती.
www.konkantoday.com