रत्नागिरीचे विवेक सोहोनी झाले बुद्धिबळाचे आंतरराष्ट्रीय पंच
रत्नागिरीचे विवेक सोहनी हे आता आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच झाले आहेत. जागतिक बुद्धिबळ संघटनेची प्रेसिडेन्शिअल बोर्ड मीटिंग हंगेरी येथे पार पडली त्यांत सोहोनी यांच्या आंतरराष्ट्रीय पंच पदावर शिक्कामोर्तब करण्यात आले .सोहाेनी यांच्या रूपाने दक्षिण महाराष्ट्रात पहिला बहुमान मिळाला आहे. सोहाेनी यांनी तीन वर्षांच्या वाटचालीत पन्नासहून अधिक आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धेत काम केले आहे. पुढील महिन्यात जागतिक युवा बुद्धिबळ अजिंक्य स्पर्धेत ते पंच म्हणून काम करणार आहेत. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
www.konkantoday.com