माजी आमदार रमेश भाई कदम राष्ट्रवादीत परतणार ?आज भूमिका जाहीर करणार

माजी आमदार रमेशभाई कदम आज आपली राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत.रमेश भाई कदम हे सध्या काँग्रेसमध्ये होते ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम करीत होते . काँग्रेसमधील गटबाजीला कंटाळून त्यांनी अध्यक्षपदाच्या राजीनामा दिला होता. पूर्वी राष्ट्रवादीचे नेते असलेले रमेश कदम यांचे माजी मंत्री भास्कर जाधव यांच्याशी जुळले नाही . त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. परंतु तेथेही अंतर्गत गटबाजीमुळे त्यांना योग्य रीतीने काम करता आले नाही. आमदार भास्कर जाधव शिवसेनेत गेल्याने रमेश कदम आता राष्ट्रवादीत परतणार असल्याची चर्चा आहे ते आज आपली भूमिका जाहीर करणार आहेत .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button