पुण्यात तुफान पाऊस
बुधवारी रात्रीपासून पुण्यात तुफान पाऊस कोसळत आहे.यामुळे शहरात अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.बिबवेवाडीतील अनेक सोसायटी, घरे, दुकानांमधे पाणी घुसले.अरण्येश्वर परिसरात भिंत कोसळून ७ जणांचा मृत्यू तर २ जण वाहून गेले.२०० पेक्षा अधिक वाहने वाहून गेली आहेत. विजेचे खांब वाकले आहेत.पाणी पुरवठा केंद्रात पाणी शिरल्याने पुण्यात पुढील पाच दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.३ तासात ११२ मिमी पावसाची नोंद पुण्यात झाली आहे.दहा वर्षातील विक्रमी पाऊस झाल्याचे बोललेजात आहे.