पश्चिम बंगालमधील कमी दाबाच्या पट्टय़ामुळे पावसाचा जोर राहणार
पुणे – बंगालचा उपसागर आणि आंध्रप्रदेश दक्षिण भाग ते तामिळनाडूच्या उत्तर भागात असलेल्या चक्राकार स्थितीचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला आहे. त्यामुळे आता राज्यात आगामी दोन दिवस काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
_______________________________________
*माई हुंडाई रत्नागिरीमधून सेंट्रो सीएनजी कार खरेदी करा आणि पेट्रोल दरवाडीची चिंता सोडा संपर्क-9922949540, 9206202122*
_______________________________________
अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘हिक्का’ चक्री वादळाचा वेग वाढल्याने अरबी समुद्रात जोरदार वारे वाहत होते हे वादळ जरी ओमनच्या दिशेने सरकले असले, तरी ते दमनच्या ईशान्यकडे 350 किलोमीटर अंतरावर होते. त्यामुळे कोकण-मुंबईसह घाट माथ्यावर जोरदार पाऊस पडला. हे चक्रीवादळ शमत होत नाही, तोच बंगालच्या उपसागरात चक्रावात निर्माण झाला आहे.
www.konkantoday.com