अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करा राष्ट्रवादीच्या सदस्यांना व्हीप

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करावे यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा परिषदमधील गटनेते विक्रांत भास्कर जाधव यानी पक्षाच्या सदस्यांना व्हीप बजावला आहे.

__________________________

माई हुंडाई रत्नागिरीमधून सेंट्रो सीएनजी कार खरेदी करा आणि पेट्रोल दरवाडीची चिंता सोडा संपर्क-9922949540, 9206202122

__________________________

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्याविरोधात शिवसेने सह अन्य सदस्यांनी अविश्वास ठराव आणला असून त्यावर ३०तारखेला मतदान होणार आहे. या ठरावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी सदस्यांनी सभागृहात उपस्थित रहावे व ठरावाच्या बाजूने मतदान करावे असा पक्षादेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते विक्रांत जाधव यानी जाहीर केला आहे. जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे चौदा सदस्य आहेत दरम्यानराष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव हे शिवसेनेत गेल्याने त्यांच्याबरोबर काही राष्ट्रवादीचे जिप सदस्य शिवसेनेत गेले असले तरी ते कागदोपत्री राष्ट्रवादी पक्षात आहेत. गटनेत्यांनी व्हिप बजावला असला तरी राष्ट्रवादीच्या सदस्या नफिसा परकार यांनी या अविश्वास ठरावाला विरोध दर्शवला होता. यामुळे सभागृहात राष्ट्रवादीचे सदस्य कोणती भूमिका घेणार हे लवकरच स्पष्ट होईल.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button