आवाशी येथे ट्रक डंपर अपघातात दोन जण जखमी
मुंबई गोवा महामार्गावर आवाशी येथे ट्रक आणि डंपर यांच्यात झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक किरकोळ जखमी झाले. गुजरातहून लोटे येथे येणारा ट्रक चालक अब्दुल चौधरीनेआपल्या ताब्यातील ट्रक मुंबईच्या दिशेने जाणाऱया डंपरच्या विरुद्ध दिशेला जाऊन धडकवला. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. डंपर चालक प्रभू यादव व ट्रक चालक अब्दुल चौधरी हे किरकोळ जखमी झाले.
www.konkantoday.com