मारुती सुझुकी कंपनीने आपल्या गाड्यांच्या आपल्या किमती उतरवल्या
मारुती सुझुकी कंपनीची नवी कार खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. कारण, देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुतीने आपल्या अनेक वाहनांच्या किंमतीत कपात केली आहे. बुधवारी कंपनीने याबाबत माहिती दिली. आजपासून(दि.25) नव्या किंमती लागू झाल्याचंही कंपनीने स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, सरकारने कंपनी करामध्ये कपात केल्याने वाहनांच्या किंमती कमी झाल्याचं मारुतीने म्हटलं आहे. कंपनीने, ऑल्टो 800, ऑल्टो के10, स्विफ्ट डिझेल, सिलेरियो, बलेनो डिझेल, इग्निस, डिझायर डिझेल, टूर एस डिझेल, व्हिटारा ब्रेजा आणि एस-क्रॉस या वाहनांच्या किंमतीत कपात केल्याचं जाहीर केलं.