प्रसिद्ध येवले चहावर एफडीएची धाड
पुण्यातील प्रसिद्ध व अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या येवले चहाच्या कोंढव्यातील उत्पादन केंद्रवर अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) यांनी धाड टाकली.येवले चहा प्यायल्याने पित्त होत नाही. तसेच, चहासाठी मिनरल वॉटर वापरले जात असल्याचा चुकीचा दावा त्यांना भोवला असून, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, पँकबंद मालावर कोणती माहिती नसणे अशा विविध नियमांचे उल्लंघन केल्याने पुढील आदेश येईपर्यंत उत्पादन केंद्र बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. मात्र, शहरातील विविध चहा केंद्र मात्र, माल असेपर्यंत सुरु राहणार आहेत.ही कारवाई अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) सह आयुक्त एस. एस. देशमुख यांनी केली.