तर माझी तुरुंगात जाण्याची तयारी आहे -शरद पवार

मुंबई : मला तुरूंगात पाठवावं असं सरकारला वाटत असेल तर तुरूंगात जाण्याची माझी तयारी आहे.’ अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईडीच्या कारवाई नंतर प्रतिक्रिया दिली. राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालयाने (ईडी)ने शरद पवार यांच्यासह विविध पक्षाच्या 70 संचालकांवर गुन्हा दाखल केला .

शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, ‘सध्या राज्यभरात माझ्या सभा मेळाव्यांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद व त्यातल्या त्यात तरूणांचा सहभाग पाहता ही कारवाई झाली नसती तरच आश्चर्य वाटले असते.’अशा शब्दात पवार यांनी या कारवाईवर भाष्य केले.
www konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button