कारवाईच्या निषेधार्थ आज बारामती शहरात कडकडीत बंद
राज्य शिखर बँक प्रकरणी ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला.या केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज बारामती शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
आज सकाळपासूनच लोकांनी आपापले व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद ठेवून या कारवाईचा निषेध केला आहे. बारामती शहरातील बंदच्या पार्श्वभूमीवर बारामतीत अतिशय कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे .