चिपळूण येथील ब्रेक टेस्टिंग ट्रॅकचा ६ जून रोजी शुभारंभ

चिपळूण ः रिक्षा चालक मालक व माल वाहतूकदार संघर्ष समितीचे ब्रेक टेस्ट ट्रेकचे स्वप्न अखेर साकार झाले आहे. दीड वर्षाच्या संघर्षानंतर हा ट्रॅक उभा राहिला असून खा. विनायक राऊत आणि आ. सदानंद चव्हाण यांच्यासह परिवहन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत पिंपळी खुर्द येथे ६ जून रोजी सायंकाळी ४.३० वा. या ट्रॅकचा शुभारंभ केला जाणार आहे. संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले व पदाधिकारी या कार्यक्रमाची जय्यत तयारी करीत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button