
प्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःवर झाडून घेत आत्महत्या केली
सोलापुरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. ज्या रुग्णालयात एक ना दोन अशा हजारो रुग्णांना जीवदान दिलं,त्याचठिकाणी अखेरचा श्वास घेतला. प्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःवर झाडून घेत आत्महत्या केली आहे.यामुळे सोलापूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.डॉ. शिरीष वळसंगकर यांनी सोलापूर शहरातील त्यांच्या मोदी परिसरात असलेल्या घरी टोकाचं पाऊल उचलत स्वतःवर गोळी झाडत जीवनयात्रा संपवली. डॉ. वळसंगकर यांनी त्यांच्याकडे असलेल्या बंदुकीतून दोन राऊंड फायर केल्या. त्यातील एक गोळी डोक्याच्या आरपार गेल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
सोलापूर शहरात वळसंगकर यांचं मोठं नाव होतं. पण ज्या रुग्णालयात त्यांनी हजारो कित्येक रुग्णांवर उपचार केले. त्यांनी जीवदान दिलं, त्याच रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ही घटना शुक्रवारी (ता.18) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.