रिफायनरी समर्थक असणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करणार
रिफायनरीचे समर्थन करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकार्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.नाणार रिफायनरी विरोधकांची बैठक काल खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत तारळ येथे पार पडली. या बैठकीत शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून प्रकल्प समर्थकांना पाठबळ दिले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. या पदाधिकाऱ्यांना पक्षातून काढून टाकावे अशी सभेतील काही नेत्यांनी मागणी केली होती. यावर राऊत यांनी त्यांची मागणी मान्य करून तुम्ही नावे द्या आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो असे आश्वासन दिले.
www.konkantoday.com