माजी तालुकाध्यक्ष नाना मयेकर राष्ट्रवादीत
रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण भागातील आक्रमक नेतृत्व असलेले काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष दिलीप उर्फ नाना मयेकर यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. चिपळूण येथे पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात खासदार अमोल कोल्हे व खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मयेकर यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. मूळचे काँग्रेसचे असलेले मयेकर यांनी १९९९मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांनी ग्रामीण भागात चांगले कामही केले होते. त्यावेळचे आमदार उदय सामंत यांचे बरोबर त्यांचे फारसे जुळले नाही. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकून आमदार सामंत यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून ते तालुका अध्यक्ष होते.आता त्यांनी परत राष्ट्रवादी पक्षात परतण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या प्रवेशामुळे रत्नागिरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळणार आहे.
www.konkantoday.com