
नेवरे येथे भिंत कोसळल्याने एक जण मृत्युमुखी
रत्नागिरी तालुक्यातील नेवरे येथे घराची भिंत अंगावर कोसळून दिलीप कृष्णा सुर्वे हे मृत्युमुखी पडले.यातील दिलीप सुर्वे नेवरे गावात राहतात. ते आपल्या घरी रात्री झोपले होते. त्यांचे घर जुने असून याच्या भिंती जीर्ण झाल्या होत्या. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे या भिंती कमकुवत झाल्या होत्या. ही भिंत अचानक त्यांच्या अंगावर कोसळली व त्याखाली सापडून सुर्वे मृत्युमुखी पडले.
www.konkantoday.com