जिल्हा बँकेला बेस्ट प्रॉडक्ट इनोव्हेशन पुरस्काराने गोवा येथे सन्मानित
बँकिंग फ्रंटियरस कडून जाहीर झालेला बेस्ट प्रॉडक्ट इनोव्हेशन पुरस्कार नुकताच रत्नागिरी जिल्हा बँकेला गोवा येथे झालेल्या शानदार समारंभात प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार बँकेचे अध्यक्ष डॉ तानाजीराव चोरगे,कार्यकारी संचालक श्री सुनील गुरव यांनी स्वीकारला. हा पुरस्कार गोव्याचे मंत्री गोविंद गावडा कर्नाटकचे माजी मंत्री एच के पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.या पुरस्कार वितरण सोहळ्याला बँकेचे संचालक संजय शेट रेडीज , रमेश दळवी, चंद्रकांत बाईत ,सुधीर कालेकर,जयवंत जालगावकर, मधुकर टिळेकर, महादेव सप्रे, राजेंद्र सुर्वे, डॉ. अनिल जोशी, जितेंद्र साळवी, संचालिका सौ नेहा माने, सौ शुभांगी गोखले, जनसंपर्क अधिकारी श्री संदीप तांबेकरअादी उपस्थित होते.जिल्हा बँकेला याधी सहकार क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
www.konkantoday.com