
अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार
खेड तालुक्यातील आंबये येथील बाईतवाडी येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल झाली आहे.
बाईतवाडी राहणारी ही अल्पवयीन मुलगी घरात बाहेरच्या खोलीत झोपली होती.पहाटे तिच्या नातेवाईकांनी पाहिले असता ही मुलगी तेथे दिसली नाही.या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार खेड पोलिसांना स्थानकात करण्यात आली आहे.या प्रकरणात संशयित म्हणून अक्षय जुवळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com