
अल्पवयीन तरुणीशी गैरवर्तन करणाऱ्याला सहा महिने शिक्षा
रस्त्यात अल्पवयीन तरुणीचा हात पकडून लग्नाची मागणी करणाऱ्या व तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या सुभाष मयेकर याला न्यायालयाने सहा महिन्याची कैद व वीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
रत्नागिरी शहरातील गाडीतळ भागात सदरची अल्पवयीन तरुणी रस्त्याने जात असता मयेकर याने सदर तरुणीचा हात पकडून तू माझ्याशी लग्न करशील का असे बोलून गैरवर्तन केले होते. याबाबत सदर तरुणीने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आरोपींवर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्यात सरकारी वकील अनिरुद्ध फणसेकर यांनी काम पाहिले.
www.konkantoday.com