विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून रत्नागिरी जिल्ह्यात एकून पाच विधानसभेच्या जागा आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात १३लाख ८हजार ८००मतदार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे.लोकसभा निवडणुकीनंतर ३१हजार ६५९युवा मतदारांनी नावे नोंदविल्याने ते प्रथमच या निवडणुकीत मतदान करणार आहेत.
आता आचारसंहिता जाहीर झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकारयांची वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. याशिवाय भूमिपूजने पोस्टर्स राजकीय झेंडे लावण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात स्त्री मतदारांची संख्या जास्त आहे जिल्ह्यात ६लाख २६हजार ९०६पुरुष तर ६लाख ८१हजार ८८४स्त्री मतदार आहेत. मतदानासाठी ३हजार ६७६मतदान यंत्रे जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध आहेत. अपंग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी एनसीसी व स्काऊट गाइड विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button