भाजपाच्या प्रयत्नाने अल्पसंख्यांक वस्तीसाठी 1 कोटी 70 लाख निधी मंजूर
पाणीयोजना, रस्ते, पाखाड्या, पथदीपांचा समावेश.रत्नागिरी जिल्हा भाजपाच्या प्रयत्नाने जिल्ह्यासाठी सुमारे एक कोटी 70 लाख निधी मंजूर झाला आहे. अल्पसंख्याक वस्तीतील ग्रामपंचायतीसाठी विशेष निधी प्राप्त व्हावा, यासाठी जिल्हा भाजपाने प्रस्ताव दिला होता. त्या मागणीनुसार मंत्री विनोद तावडे यांनी निधी मंजूर करून जिल्ह्याच्या विकासाला चालना दिली आहे. हा निधी मंजूर होण्याकरिता भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी पाठपुरावा केला.
मंजूर कामांची यादी व निधी रक्कम
*रत्नागिरी तालुका- गोळप मोहल्याकडे जाणारा 10 लाख रु. नेवरे बौद्धवाडीत पाणी योजना बांधकाम 10 लाख रु, उमरे जॅकवेलपासून मुस्लीमवाडी पर्यंत पाणी योजना 10 लाख.
*राजापूर तालुका- सौंदळ मुस्लीम मोहल्ला जॅकवेल बांधणे व पाणी पुरवठा करणे, 10 लाख रुपये, तळगाव टाकेवाडी रस्ता ते हाणूवाडी कब्रस्तानकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 15 लाख, साखरीनाटे हुना मास्तर बंदर रोड रस्ता बांधणी 10 लाख, नाटे नजफनगर मस्जीद ते जैतापूर फाटा रस्ता 10 लाख.
*लांजा तालुका- भांबेड कब्रस्तान संरक्षक भिंत बांधणे 10 लाख.
*संगमेश्वर तालुका- तुळसणी मोहल्ला कब्रस्तान रस्ता तयार करणे 10 लाख, कळंबस्ते मोहल्ला येथे संरक्षक भिंत 10 लाख रु., मोहल्ला अंतर्गत पाखाडी बांधणे 5 लाख.
*चिपळूण तालुका- शिरळ बन मोहल्ला कब्रस्तान भिंत बांधणे 15 लाख, उमरोली बौद्धवाडी येथे रंगमंच बांधणे 10 लाख, आबीटगाव बौद्धवाडी ते सावर्डे तवसाळ रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे 8 लाख, कुंभार्ली अशोकस्तंभ बौद्धवाडी ते चंद्रकांत भांडार पाखाडी बांधणे 5 लाख, वाघिवरे ताहीर अनवरे यांचे घर ते प्राथमिक शाळा मोहल्ला रस्ता खडीकरण डांबरीकरण 10 लाख, चिवेली मोहल्ला लोणारी बंदर येथील रस्त्यावर पथदिवे 10 लाख, चिवेली लोणारी बंदर रस्ता खडीकरण डांबरीकरण 10 लाख, खडपोली एमआयडीसी रोड ते दर्गा रस्ता खडीकरण व डांबरीकरण 8 लाख, कोळकेवाडी बौद्धवाडी येथे सभा मंडप बांधणे 15 लाख, पिंपळी बु. रत्नागिरी कराड चिपळूण हायवे ते चांदणी मस्जीद रस्ता तयार करणे 10 लाख, अलोरे मराठी शाळा ते हसन खोत मुल्ला घरापर्यंत पाखाडी व संरक्षक भिंत 7 लाख, पिंपळी कब्रस्तानाला संरक्षक भिंत 10 लाख, कब्रस्तान अंतर्गत पाखाडी व निवारा शेड 10 लाख, कुंभार्ली मोहल्ला कब्रस्तान येथे कंपाऊड वॉल 10 लाख, अलोरे लमाणी रोड मोहल्ला रस्त्याला संरक्षण भिंत 10 लाख, चिंचघरी सती रस्त्याकडे जाणार्या रस्त्याला संरक्षक भिंत 10 लाख, कान्हे कब्रस्तान रस्ता डांबरीकरण 10 लाख, पेढे बौद्धवाडी येथे स्मशानभूमी शेड 5 लाख, बौद्धवाडी पारवाडी येथे स्मशानभूमी शेड 5 लाख, धामणदेवी रोड ते बौद्धवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण 5 लाख.
*दापोली तालुका देवके बौद्धवाडी ते दत्तवाडी रस्ता डांबरीकरण 10 लाख, करजगाव चिपळूणकरवाडी येथे नळपाणी पुरवठा योजना 15 लाख, माथेगुजर बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण 10 लाख, वणौशीतर्फे पंचनदी बौद्धवाडी अंतर्गत पायवाटा पेवर ब्लॉक 5 लाख, देवके बौद्धवाडी सभागृह आवारात सुशोभीकरण 10 लाख, देवके मुख्य रस्ता कब्रस्तान नजिक ते बोबडेवाडीपर्यंत डांबरीकरण 5 लाख, उबरडे मेहबूबनगर बोबडेवाडी मुख्य रस्ता ते नाचरेवाडी रस्ता उंची वाढविणे 3 लाख, मेहबूबनगर आमिन मनाजी यांच्या घराजवळ रस्त्याला संरक्षक भिंत 10 लाख, कोपळे जमातवाडी लांजेवर याच्या जमिनीमध्ये स्मशानभूमीसाठी संरक्षण भिंत बांधणे 3 लाख, तिथवती काझीवाडी बाबालाल येथील पथदीप 3 लाख, असलम काझी याच्या घराजवळ रस्त्याला सरक्षक भिंत 5 लाख, कोपळे जमातवाडी मुख्य रस्ता ते थोडगे यांच्या घरापर्यंत रस्ता खडीकरण डांबरीकरण 2 लाख.
*गुहागर तालुका- पांगारी तर्फे हवेली जेटी ते कबुला हुसेन दर्गा रस्ता खडीकरण डांबरीकरण 10 लाख रु., भुरकुंडा मोहल्ला ते सडेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण 10 लाख रु., पेवे गुरवकोंड ते मुस्लीम मोहल्ला खडीकरण डांबरीकरण 10 लाख, पडवे मुस्लीम मोहल्याकडे जाणार्या रस्त्याकडे खडीकरण, डांबरीकरण 10 लाख.