
नाणार रिफायनरीच्या मुद्द्यावरून काही राजकीय पक्ष व इतर काही जण स्वतःची पोळी भाजत आहेत -अविनाश महाजन यांची जोरदार टीका
काही राजकीय पक्ष नाणार रिफायनरी प्रकल्पावरून आपल्या स्वार्थी राजकारणासाठी विरोध करून स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहेत. या लोकांना आत्तापर्यंत राजापूरसाठी काहीही देता आले नाही अशी जोरदार टीका कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे सचिव अविनाश महाजन यांनी केली आहे.
नाणार रिफायनरी प्रकल्प हा तीन लाख कोटी रुपयांचा असून संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. प्रकल्पाबाबत शहानिशा न करताच ते प्रकल्पाला विरोध करीत आहेत.यांच्या मते हा प्रकल्प विनाशकारी असेल तर आमने सामने चर्चेला येऊन सिद्ध करावे. हे सिद्ध झाल्यास आम्ही तात्काळ प्रकल्पाच्या विरोधात उतरू असे आव्हान महाजन यांनी प्रकल्प विरोधकांना दिले आहे.ही मंडळी महिलांची ढाल पुढे करून लढा लढत आहेत.
परंतु प्रकल्पाच्या विरोधाचे राजकारण नाणारमध्ये उगवणाऱ्या चार पाच दलालांचे अर्थ कारण आहे.त्याला किती बळी पडायचे हे नव्या पिढीने व राजापूर वासियांनी ठरवावे असेही महाजन यांनी म्हंटले आहे.
www.konkantoday.com