नागरिकांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी भाटे येथे बांधण्यात आलेल्या ओपन जीमचा वापर नाही
मोकळ्या हवेत नागरिकांनी आेपन जिमचा वापर करून तंदुरुस्त रहावे यासाठी रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या पुढाकाराने भाटय़े समुद्र किनारी बांधण्यात आलेल्या ओपन जीमचा वापर कमी प्रमाणात होत आहे.या ओपन जीमच्या आजूबाजूला कचऱ्याचे व दारूच्या बाटल्यांचे ढिग पडले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी भाटे समुद्र किनारी निसर्गरम्य ठिकाणीओपन जीम उभी करण्याची संकल्पना मांडली आणि अंमलातही आणली त्या प्रमाणे भाटय़े किनाऱयावर गणपती मंदिराच्या समोरील किनाऱ्यावर ही जिम उभी करण्यात आली या किनाऱ्यावर सकाळपासून अनेक जण वॉकिंगसाठी येत असल्यामुळे या ओपन जीमचा वापर करून रत्नागिरीकर तंदुरुस्त राहावेत असा जीमचा हेतू हाेता प्रत्यक्षात या जीमचा वापर पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याचे दिसत आहे या जिमच्या बाजूला समुद्रातून वाहुन आलेला कचरा पसरला आहे याशिवाय दारूच्या बाटल्यांचा ढीग मोठ्या प्रमाणावर पडलेलाआहे. जिम उभी करताना प्लॅटफॉर्मसाठी लोखंडी शिट वापरण्यात आले आहेत. समुद्राच्या खाऱ्या हवेमुळे या शिट गंजत चालल्या आहेत. याशिवाय जिमच्या आजूबाजूचा परिसर मेंटन नसल्याने या ठिकाणी जीमचा वापर करण्यास लोक नाउत्सुक आहेत.
www.konkantoday.com