शेतकऱ्यांनी मेहनतीने जमा केलेले दूध शीत केंद्रावर गेल्यावर नासतेच कसे ?शेतकऱ्यांचा सवाल!
लांजा तालुक्यात सात दुग्ध संस्था असून या संस्थांमार्फत जमा झालेले दूध लांजा शीतकरण केंद्रात जमा केले जाते. मात्र यातील काही दूध नासल्याचे नंतर शीतकरण केंद्राकडून सांगितले जाते. गेल्या चार दिवसांत दोनशे बारा लिटर दूध नासल्याचे शीतकरण केंद्रातर्फे सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांनी थेट शितकरण केंद्रावर धडक मारली. तालुक्यातील रवळनाथ विठ्ठलादेवी दूध उत्पादन संस्था गेली दहा वर्षे दूध संकलित करण्याचे काम करीत असून पन्नास शेतकऱ्यानी कर्ज काढून गायी घेतल्या आहेत. त्यासाठी आवश्यक असणारे फॅट मशीनही संस्थेने घेतले आहे. दुधाची तपासणी करून दूध शीतगृहात पाठवले जाते परंतु त्यानंतर त्यातील काही दूध नासल्याचे शितगृहाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे या शेतकऱ्यांनी शीतगृहात जाऊन अधिकाऱ्यांना विचारणा केली.हे दूध नासत असेल ते दूध नंतर कोठे जाते असा सवालही शेतकरी करीत आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
www.konkantoday.com