
रिफायनरीला पाठिंबा देणारे गुजराती भूमाफियांनी उभे केलेले बुजगावणे -शिवसेना खासदार विनायक राऊत
माझ्या माहितीप्रमाणे नाणार परिसरातील प्रकल्पात येणाऱ्या गावातील कोणीही लोकांनी या प्रकल्पाला समर्थन दिलेले नाही किंवा पाठिंबा दिलेला नाही या उलट समर्थन जे करीत आहेत ते बाहेरील लोक म्हणजे गुजराती माफियांनी उभे केलेले बुजगावणे असून त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी विश्वास ठेवू नये अशी आमची त्यांना विनंती आहे असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्ग येथे केले.
आपण तारळ येथे प्रकल्पग्रस्तांनी बोलावलेल्या सभेसाठी जात असल्याचे त्यांनी सांगितले.
जे जे या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीत गुंतलेले आहे. त्यांचे साहजिकच करोडो रुपयांचे नुकसान झालेले आहे. ते लोक आमच्यावर जळफळाट करणार यांची आम्हाला माहिती आहे.आम्ही त्यांच्या निषेधाला भीक घालत नाही.आम्ही तेथील भूमिपुत्रांच्या बाजूने उभे राहणार व या भूमीचे रक्षण करण्याचे आमचे व्रत आम्ही पार पडणार असेही खासदार राऊत यांनी सांगितले.
www.konkantoday.com