
नाणार प्रकल्प नको यासाठी गावागावातून संमतीपत्रे घेण्याचा निर्णय-खासदार विनायक राऊत
नाणार येथे रिफायनरी प्रकल्प नको यासाठी गावागावातून संमतीपत्रे घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती विनायक राऊत यांनी तारळ येथे दिली. मुठभर दलालांसाठी मुख्यमंत्र्यांना हा प्रकल्प आणू देणार नाही असाही इशारा त्यांनी दिला. नाणार चा मुद्दा विधानसभा निवडणुकीत अग्रस्थानी असेल असेही राऊत यांनी सांगितले.या रिफायनरीला विरोध किती आहे हे सर्वश्रुत आहे. या विरोधाचा आदर करून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस भारतीय जनता पक्षाचे, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा विषय त्या सर्वांसमोर ठेवला. मोठ्या प्रमाणावर विध्वंसकारी व विनाशकारी असलेला रिफायनरी प्रकल्प नको ही भावना सर्वांची होती.म्हणून हा प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी रद्द केला होता. दुर्दैवाने मुख्यमंत्र्यांनी यात्रेच्या निमित्ताने रिफायनरी होण्याचा पुनर्विचार केला जाईल असे सांगितल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.काही हौशा, गवशा लोकांनी त्यांची दिशाभूल केली असेल किंवा खोटेनाटे सांगितले असेल म्हणून मुख्यमंत्र्यांनी पुनर्विचार करू असे म्हटले असेल.आज प्रकल्पाला विरोध करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर हजारो लोक त्यामध्ये स्त्रिया ,वृद्ध एकत्र आले आहेत.ह्या ठिकाणी सर्वांनी एल्गार केला आहे की भविष्यात काही झाले तरी रिफायनरी प्रकल्प होऊ दिला जाणार नाही. मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन चित्र पहावे आणि भविष्यात आपले मत बदलावे असे विनायक राऊत यांनी सांगितले.या सभेला आमदार राजन साळवी यांचे सह मोठय़ा प्रमाणावर प्रकल्प विरोधक व शिवसैनिकही सहभागी झाले होते.
www.konkantoday.com