नाणार नाही म्हणजे नाहीच-शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख चंद्रकांत नकाशे
नाणार प्रकल्प शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली केव्हाच हद्दपार झालेला आहे. नाणार नाही म्हणजे नाहीच,उगाच शिळ्या कडीला ऊत आणू नकाअसा इशारा शिवसेनेचे विधानसभा संपर्क प्रमुख चंद्रकांत नकाशे यांनी दिला आहे. ग्रीन रिफायनरी असे गोंडस नाव देऊन व रोजगाराचे गाजर दाखवून दलालांच्या माध्यमातून जमिनी हडप करावयाच्या व अनेक पिढय़ांची गडगंज संपत्ती कमवायची असा मानस रिफायनरी प्रकल्पाला समर्थन करणाऱ्यांचा आहेअसा आरोप त्यानी केला.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजापुरात येऊन पुन्हा बत्ती लावून चुड लावणे म्हणजे कोकणवासी जनतेचा सरळसरळ विश्वासघात आहे अशीही टीका त्यांनी केली.
www.konkantoday.com