
दाभोळ बंदरातील चिनी नौका परतू लागल्या
वादळी वातावरणामुळे व सुरक्षितेच्या कारणास्तव रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ बंदरात उभ्या असलेल्या चिनी नौका आता परतीच्या मार्गावर लागले आहेत.एकूण आठ चिनी नौकांनी दाभोळ बंदर सोडले आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीला काही चिनी नौका वादळी वातावरणामुळे दाभोळ बंदरात दाखल झाल्या होत्या.नंतर अनेक महिने या नौका बंदरात उभ्या होत्या.यावर वेगवेगळ्या देशातील खलाशी असल्याने त्याविषयी जोरदार चर्चा होते. मध्यंतरी या बोटीवरील खलाशांमध्ये मारामारीही झाली होती. भाषेच्या अडचणीमुळे प्रशासन पोलीस यंत्रणांना देखील त्यांच्याशी संवाद साधणे अडचणीचे होत होते. एकूण दहा मासेमारी नौका या बंदरात उभ्या होत्या त्यापैकी आठ नौकांनी आता बंदर सोडले. अजूनही दोन नौका बंदरात उभ्या आहेत.
www. konkantoday.com