आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार
सोलापूर : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी आचारसंहिता भंग केल्याचा आरोप माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी केला आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारांना मेकअप बॉक्स वाटल्याची तक्रार माजी आमदार नरसय्या आडम यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे केली. या मेकअप बॉक्सवर प्रणिती शिंदे यांचे फोटो व नाव आहे त्यांचे कार्यकर्ते आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर हे बॉक्स वाटप करीत असल्याची तक्रार आडम यांनी केली आहे.
www.konkantoday.com