राजकीय पक्षांची होर्डिंग्जवर प्रेमाची सक्ती
रत्नागिरी शहरात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या होर्डिंग्सवर विविध राजकीय पक्षांकडून होणार्या प्रेमाच्या सक्तीमुळे या होल्डिंग धारकांची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी झाली आहे.अनेकदा राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या आगमनामुळे किंवा वाढदिवसामुळे या होर्डिंग्जवर प्रेमाची सक्ती राजकीय पक्षांकडून होते. ग्राहकांच्या जाहिरातीवर रातोरात पक्षाचे बॅनर झळकतात विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उत्साहात बॅनर लावतात यानंतर कार्यक्रम होऊन दोन तीन दिवस उलटले तरी कोणी तेथे येत नाही.त्यामुळे नाईलाजाने होल्डिंग्स वाल्यांनाच हे बॅनर उतरवावे लागतात. शहर लहान असल्यामुळे सर्वजण एकमेकांच्या परिचयाचे असतात व एकमेकांना गरज लागत असते.त्यामुळे या प्रेमाच्या सक्तीमुळे होल्डिंग वाल्यांची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी झाली आहे.
www.konkantoday.com