रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी मत्स्योत्पादन घटले
रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्य उत्पादन यावर्षी घटले आहे. गतवर्षीच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यातील मत्सोत्पादन सात हजार टनांनी घटले आहे.१७-१८मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात ८०हजार ३४० टन मासळी मिळाली होती.तर १८-१९ रत्नागिरी जिल्ह्यात ७३ हजार ७३८ टन मासळी मिळाली. वातावरणातील बदलामुळे मत्स्य उत्पादन कमी होत असल्याचे सांगण्यात येत आहे.मात्र पर्ससीननेट मच्छीमारांवर घातलेले निर्बंध व नैसर्गिक आपत्तीमुळे बराच काळ मच्छीमारी ठप्प झाली होती.या सर्वाचा परिणाम मत्स्य उत्पादन घटण्यावर झाला असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.
www.konkantoday.com