
मुख्यमंत्र्यांवर शिवराळ टीका करणार्यांचा जाहीर निषेध- शिल्पा मराठे
भोळ्या महिलांना पुढे करण्यात काय पुरुषार्थ?राजापूर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत शिवराळ बोलणार्या महिला व या महिलांचे शुटिंग करून त्यांना जगासमोर सादर करणार्या आसुरी प्रवृत्तीचा निषेध. भाजपच्या राजापूर तालुका महिला आघाडीच्या चिटणीस सौ. शिल्पा धनंजय मराठे यांनी केला. या महिला भगिनी, बंधूंनो वेळीच सावध व्हा. रिफायनरीच्या रुपाने पुन्हा आलेल्या संधीचा फायदा घेऊन कोकणच्या विकासाला साथ द्या. स्थानिक तरुणांनाही रोजगार मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.महाजनादेश यात्रेत राजापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आतापर्यंतच्या इतिहासात दिसली नव्हती एवढी गर्दी पाहायला मिळाली. मुख्यमंत्र्यांची वाट पाहत डॉक्टर, इंजिनियर, वकिल, सुशिक्षित उपस्थित होते. नियोजित वेळेनंतरही 2 ते 3 तास उशिर होऊनही सर्व नागरिक उपस्थित होते. तरुणांना स्थानिक रोजगार निर्मिती व्हावी म्हणून तरुणाची संख्या अधिक होती. मुख्यमंत्र्यांनी नाणार रिफायनरीसाठी दिलेले योगदान राजकीय विरोधकांनी विरोध करून स्थगित झालेला म्हणा किंवा रद्द झालेला म्हणा हा प्रकल्प पुन्हा नाणारमध्ये व्हावा व तरुणांना आमच्याच भागात रोजगार मिळाला म्हणून तरुणांची गर्दी होती. मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत केलेल्या कामांवर सर्वसामान्य जनतासुद्धा खूष आहे, हे वेगळे सांगायला नको, असे मराठे म्हणाल्या.त्यांनी सांगितले की, आजपर्यंत कोकणात अनेक प्रकल्प राजकीय विरोधामुळे बुडविले गेले. कोकणात काही चांगलेच होऊ द्यायचे नाही. कोकणातील तरुणांना त्यांचा गाव सोडून बाहेर जावे हेच या विरोधी राजकारण्यांचे मनसुबे आहेत. कोकणातील तरुण घरदार, आईवडिल, सगेसोयरे यांच्यापासून लांब जावून चरितार्थासाठी त्याचा जीव आटवतो. आपल्या गावात रोजगाराची संधी मिळाली तर गावात राहून रोजगार व गावाच्या हितासाठी प्रयत्न करू पण नाही. या तरुणांचे खच्चीकरण कसे होईल, त्यांना त्रास कसा होईल या एकाच असुरी आनंदात हे विरोधी राजकारणी व प्रकल्पकंटक आला पुरुषार्थ समजत आहेत.रासायनिक फवारणीने प्रदूषण.रिफायनरीने प्रदूषण होणार असे विरोधकांचे म्हणणे असेल तर शेतीसाठी रासायनिक खते, आंबा-काजूसाठी विषारी रासायनिक फवारण्या, प्लॅस्टिकचा अतोनात वापर, समुद्रात एलईडीने मासेमारी, नियमबाह्य प्रदूषण करणारी वाहने याद्वारे शतपटीने प्रदूषण होते. अशा प्रदूषणासाठी विरोधकांनी आजपर्यंत का आंदोलन केले नाही. कसे करतील त्यांना तरुण वर्ग इथे ठेवायचाच नाही. त्यांचे भले चिंतायचेच नाही. विरोधकांनी अत्याधुनिक शिक्षण, अद्ययावत हॉस्पीटल, विविध प्रकारच्या प्रयोगशाळा अशा मागण्या करा, त्यासाठी आग्रही राहावे, असे शिल्पा मराठे यांनी ठणकावून सांगितले.बोलवता धनी कॅमेर्याआड. आजपर्यंतच्या इतिहासात कोकणी माणूस हा शांत, संयमी असा होता. विरोधकांच्या बेताल तालावर नाचत आमच्या काही माता-भगिनी त्यांच्या नादी लागून अर्वाच्य शिव्या, बेताल वक्तव्य आपण कोणावर काय बोलतो, कसे वागतो याचे भान न ठेवता आपलीच लायकी जगासमोर सोशल मीडियासमोर ठेवून जगाने या भगिनी पाहिल्या पण त्यांच्यामागचे बोलवते धनी मात्र कॅमेर्याआड राहिले. याची लाज वाटली का? भोळ्याभाबड्या महिलांना अशा स्वरूपात पुढे करण्यात कसला पुरुषार्थ? असा सवालही त्यांनी केला.
www.konkantoday.com