![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2019/09/IMG-20190920-WA0012.jpg)
भाजपाचे नगरसेवक उमेश कुळकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांना दिली पुस्तकरुपी आगळी भेट
महाजनादेश यात्रेच्या दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मोठमोठे हार घालून सर्वजण स्वागत करीत असताना भाजपाचे नगरसेवक व शहर सरचिटणीस उमेश कुळकर्णी यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे स्वागत करण्यासाठी आगळा मार्ग अवलंबिला.भारताचे दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील “वाजपेयींचे पैलू “हे सुंदर पुस्तक त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून दिले. मुख्यमंत्र्यांनीही या भेटीचे कौतुक केले आपण दिलेली पुस्तक रुपी भेट मुख्यमंत्र्यांच्या कायम स्मरणात राहणार असल्याने कुलकर्णी यांनी आनंद व्यक्त केला आहे. या भेटीच्या वेळी भाजपचे उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन , डॉक्टर विनय नातू ,सचिन करमरकर आदी जण उपस्थित होते.
www.konkantoday.com