फळ प्रक्रिया उद्योगावरील जीएसटी कमी करण्याची मागणी

आंबा, कोकम, काजू, फणस या हंगामी फळापासून होणाऱ्या प्रक्रिया उत्पादनांवर १२टक्के जीएसटी कर आकारण्यात येत आहे.हा जीएसटी कर ५ टक्के करण्यात यावा अशी मागणी पावस येथील प्रसिद्ध आंबा बागायतदार जयंत देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. मुख्यमंत्री फडणवीस रत्नागिरी दौर्‍यावर आले असताना देसाई यांनी त्यांना निवेदन दिले.कोकणातील फळ उद्योगासाठी तालुका स्तरावर संशोधन केंद्राची सुविधा उपलब्ध करून द्यावी व अन्य मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.यावेळी आनंद देसाई व अमर देसाई हे उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button