खासदार विनायक राऊत जिल्हा दौर्यावर उद्या येणार
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत हे उद्या रत्नागिरी सिंधूर्गात जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील खवळे गणपतीचे दर्शन घेऊन ते राजापूर तालुक्यातील नाणार रिफायनरी प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मौजे तारळ येथे येणार आहेत.त्या ठिकाणी ते साडेबारा ते तीन वाजेपर्यंत प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत.
त्यानंतर रत्नागिरी येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात जिल्हा परिषद अध्यक्ष व सदस्यांची ते भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर रात्राै कडवई येथील चंद्रकांत जाधव यांच्या एकवीस दिवसांच्या गणपतीचे दर्शन घेऊन ते संगमेश्वर येथून कोकणकन्या एक्स्प्रेसने मुंबई येथे रवाना होणार आहेत.
www.konkantoday.com