
कोकणासह राज्यात पावसाचा जोर कमी होणार
पुणे -कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने राज्यातील बहुतांशी भागात सध्या पाऊस पडत आहे. तर पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक आहे. गेले काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र पाऊस होत आहेत.गणेशोत्सवा नंतर दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला होता. त्यात मुंबईसह कोकणात पावसाचा जोर अधिक होता.हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पश्चिम किनारपट्टीवर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र हे आता गुजरातकडे सरकले आहे. त्यामुळे शनिवारपासून पावसाचा जोर थोडा कमी होईल.
www.konkantoday.com