
उद्योजक सतीश वाघ यांना तीन पुरस्कार
औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल लोटे औद्योगिक वसाहतीतील सुप्रिया लाईफ सायन्स या कंपनीचे मालक सतीश वाघ यांना भारत सरकार सह अन्य संस्थांकडून तीन पुरस्कार मिळाले आहेत.भारतीय महानतम विकास पुरस्कार त्यांना मुंबई येथील हॉटेल ताजमध्ये आयोजित कार्यक्रमात देण्यात आला.तर भारत सरकारच्या निर्यात संवर्धन परिषदे मार्फतही सर्वोत्कृष्ट निर्यात पुरस्काराने त्यांना हैदराबाद येथे गौरवण्यात आले. याशिवाय औद्योगिक क्षेत्रात उत्तम ग्राहक वर्ग निर्माण करून दर्जा सिद्ध केल्याबद्दल सारस्वत बँकेच्यावतीने उत्तम ग्राहक पुरस्कारही त्यांना देण्यात आला. वाघ यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
www.konkantoday.com