
वीज मंडळाच्या बेफिकीर कारभारामुळे मुलीला गमवावा लागला जीव
वीज मंडळाच्या बेपर्वाईमुळे चिपळूण तालुक्यातील पोफळी पंचधारा धनगरवाडी येथील धनश्री सखाराम खरात या १४ वर्षाच्या मुलीला वीजेचा शॉक लागल्याने आपला जीव गमवावा लागला . पोफळी टीआरटी मारूती मंदिर परिसरात ही घटना घडली. सायंकाळी साडेसहा वाजता हा प्रकार समोर आला. महावितरणच्या तुटलेल्या तारेशी संपर्क आल्याने तिचा मृत्यु झाला. दोन दिवसापासून पोफळी मारूती मंदिर टीआरटी परिसरातील डोंगराचा काही भाग खाली कोसळला होता. दरडींमुळे महावितरणची विद्युत वाहिनी तुटली होती. या घटनेची दोन दिवसानंतरही महावितरणने दखल घेतली नव्हती धनश्री व तिची बहिण पायवाटेवरून जात असताना तीचा तुटलेल्या तारेशी संपर्क आला आणि जाग्यावरच तिचा मृत्यु झाला.
www.konkantoday.com