रत्नागिरीत कोतवडे येथे घरफोडी ,साडेसहा लाखांचा ऐवज लंपास

रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे येथे गणपत रावजी नेवरेकर राहणार नेवरे यांचे बंद घर अज्ञात चोरट्यानी फोडून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा साडेसहा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.फिर्यादी गणपत नेवरेकर हे आठवडाभरासाठी आपल्या संगमेश्वर येथील नातेवाईकांकडे गेले होते.त्या काळात अज्ञात चोरट्याने राहत्या घराचे मागील कुलूप बनावट चावीने उघडून घरात प्रवेश करून घरात ठेवलेल्या कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा साडेसहा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.नेवरेकर हे परतल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आला त्यानी ग्रामीण पोलीस स्थानकात या विरुद्ध फिर्याद नोंदवली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button