दापोलीत शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर तीन अल्पवयीन मुलानी केला अत्याचार
दापोली तालुक्यातील एका शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर गावातील तीन अल्पवयीन मुलांनी अत्याचार केल्याची घटना उघड झाली असून ही विद्यार्थिनी गर्भवती झाल्याने हा प्रकार उघड झाला.
अल्पवयीन मुलगी तेरा वर्षांची असून नववीत शिकत आहे.एप्रिल महिन्यात सदर मुलगी घरात एकटी असताना गावातील अल्पवयीन मुलाने घरात शिरून तिच्यावर अत्याचार केला.ही गोष्ट कुणाला सांगू नकोस असे सांगितले त्यानंतर सदर अल्पवयीन मुलगा आपल्या दोन अल्पवयीन मित्रांसह तरुणीच्या घरात जाऊन तिच्यावर तिघांनी अत्याचार केले.हा प्रकार जून पर्यंत चालू होता. मुलीच्या आईला संशय आल्याने तिने रुग्णालयात जाऊन मुलीची तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे आढळले त्यानंतर मुलीने घरच्यांना सर्व प्रकार सांगितल्यावर पीडित मुलीच्या आईने पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली.आता या अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com