
खेडमध्ये मोबाईल शॉपी फोडली ,साडेपाच लाखांचे मोबाईल चोरले
खेडमधील ओमसाई मोबाइल शॉपी फोडून चोरट्यांनी साडेपाच लाख रुपयांचे एकेचाळीस मोबाइल हँडसेट चोरून नेले.
खेड येथील प्रवीण लक्ष्मण पवार यांचे खेड येथे ओमसाई मोबाइल शॉपीचे दुकान आहे.अज्ञात चोरटय़ांनी या दुकानाच्या शटर्स व दरवाजे वाकवून दुकानात प्रवेश केला. दुकानातील साडेपाच लाख रुपये किमतीचे एकेचाळीस मोबाइल हँडसेट चोरून नेले सकाळी चोरीचा प्रकार लक्षात आल्यावर पोलीस स्थानकात पवार यांनी तक्रार दाखल केली.
www.konkantoday.com