खासदार विनायक राऊत यांना मुख्यमंत्र्यां विरोधी बोलण्याचा नैतिक अधिकार नाही -सिंधुदुर्ग भाजप उपाध्यक्षा राजश्री धुमाळे

मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने कोकणात आले होते़. राजापूर येथे नाणार प्रकल्प समर्थकांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्प समर्थकांसमवेत बैठक घेण्याचे आश्वासन देत प्रकल्प करण्याच्या बाजूने सहमती दर्शवली़.त्यावर खा़. विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात रिफायनरीचा फायदा मुख्यमंत्र्यांना होईल, कोकण वासियांना होणार नाही. १ लाख रोजगार भूमिपूत्रांना भेटणार आहे का? असा सवाल करत टिका करण्याचा प्रयत्न केला.या वक्तव्याबद्दल भाजपाकडून आम्ही जाहीर निषेध करत असल्याची भूमिका सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा उपाध्यक्षा राजश्री धुमाळे यांनी मांडली.कणकवली भाजपा कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीतील कार्यकर्त्यांचा विरोध असताना देखील केवळ मुख्यमंत्र्यांच्या शब्दाखातर आम्ही विनायक राऊत यांचे काम केले.त्या विनायक राऊत यांना आमच्या मुख्यमंत्र्यांविरोधात बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडून नाणार प्रकल्पाचे समर्थन करण्यात आले आहे़. त्यांनी हे समर्थन करताना नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत आम्ही अभ्यास केला असून रोजगारासाठी नाणार प्रकल्प कोकणात व्हायला हवा, अशी भूमिका मांडली़ पहिल्यांदा खा़ विनायक राऊत यांनी रिफायनरीबाबत आदित्य ठाकरे यांचा सल्ला घ्यावा, अशी बोचरी टिका राजश्री धुमाळे यांनी केली.
भारतीय जनता पार्टीचा रिफायनरी प्रकल्पासाठी आग्रह आहे़.बेरोजगारांना रोजगार देण्याच्या दृष्टीने कोकणात येणारा हा महत्वाचा प्रकल्प आहे़.त्यामुळे जनतेला विश्वासात घेऊन नाणार प्रकल्प व्हावा ही आजही आमची भूमिका आहे़. प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली नाणार प्रकल्पाचे समर्थन आम्ही करत आहोत़. निवडणुकीनंतर नाणार प्रकल्पावर चर्चा होऊन प्रकल्प होण्याबाबत आमचे सातत्याने प्रयत्न राहतील़ त्या उलट खा़ विनायक राऊत यांनी रोजगार निर्मितीसाठी काय केले? असा सवाल राजश्री धुमाळे यांनी केला.दोन वेळा मोदी लाटेत निवडून आलेल्या खा.विनायक राऊत यांनी केवळ बीएसएनएलच्या टॉवरची भूमिपूजने केली.त्या ठिकाणी अद्यापही मोबाईला रेंज येत नाही. सहा महिने दिल्लीत जाऊन बसणाऱ्या खा.विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर टिका करू नये़ असेही त्यानी सांगितले.
एकीकडे मुख्यमंत्र्यांवरील टीकेवरून सिंधुदुर्गात भाजप आक्रमक झाला असला तरी रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपचे नेते मात्र याविषयी अजूनही मौन पाळून आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button